Saturday 29th October 2016
हडपसर परिसरातील सर्व श्रद्धावानांना नम्र आवाहन.
काल हडपसर उपासना केंद्रामार्फत सोलापुर रोडवरील खामगाव फाटा येथील ऊसतोडणी कामगार वस्तिवर सर्वेक्षण करण्यात आले.
दिवाळीत सर्व गोडफराळासाठी व मिठाईसाठी साखर वापरण्यात येते ती साखर ऊसापासुन बनवीण्यात येते , तो ऊस तौडण्याची प्रक्रीया अतिशय कष्टदायक असते. ऊसाच्या धारदार पात्यांनी कापल्याने अनेक जखमा होत असतात. त्याहुनही कष्टदायक व हलाखीचे आहे त्या ऊस तोडणी कामगारांचे जीवन .
ऐन दिवाळीत अन्नाचे दुर्भिक्ष्य, तर इतर वेळी काय याची कल्पना येते. सद्गुरु श्री. बापुंच्या प्रेरणेने आपण उद्या भाऊबीजेच्या दिवशी त्यावस्तीत फराळ वाटप करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी खालील ठीकाणी फराळ जमा करणेत यावा. १)विलाससिंह कुलकर्णी फुरसुंगी.२)सुभाषसिंह देवरकर ,भेकराई नगर ३)राजेंद्रसिंह कुलकर्णी ,ससाणेनगर.
हरिॐ ॥वरील फराळवाटपसेवा ऊद्या दुपारी दि.१/११/२०१६ रोजी करण्याची असल्याने फराळ दुपारी १२वाजेपर्यंत पोचविणेत यावा. अंबज्ञ
विठोबाचे राज्य आम्हा
नित्य दिपवाळी
खरंच आपल्या जीवनात प.पु. सद्गुरु बापू आले आणि नित्य दिवाळीचा अनुभव आपण घेत आहोत.
आज लक्ष्मीपूजन! दिवाळीतील एक आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस! आज बापू कृपेने आणि बापू इच्छेने हडपसर केंद्रातील आम्ही 5 श्रद्धावान *जुने ते सोने* अंतर्गत सेवेसाठी सर्वे करण्यासाठी यवत जवळील खामगाव फाटा ( सोलापूर रोड वर) गेलो होतो. ह्या भागात ऊसाचे गुऱ्हाळ (गुळ तयार करण्याचे ठिकाण) बरेच आहेत. तेथे ऊस तोड कामगाराच्या बऱ्याच वस्त्या ह्या भागात आहेत.
आम्ही 3 ठिकाणी सर्वे केला. आज दिवाळीचा सण साजरा करत आहोत पण त्याठिकाणी आम्हाला दिवाळी कुठल्याही स्वरूपात दिसली नाही. बरीच मंडळी सण असूनही कामाला गेली होती. स्त्रिया, लहान मुले आणि काही पुरुष मंडळींना आम्ही भेटलो..बऱ्याच लहान मुलांच्या अंगावर कपडे नव्हते..ताडपत्री आणि प्लास्टिक ने बनवलेल्या तात्पुरत्या झोपडी मध्ये हि सर्व मंडळी राहते .
दिवाळीमध्ये आपण सुगंधी तेल, उटणे लावून अभ्यंग स्नान करत असतो. पण ह्या मंडळींना साधं तेल सुद्धा नशिबी नाहीय..
चर्चा करताना त्यातील एक व्यक्ती आम्हाला त्यांच्या गरिबीविषयी सांगत होता. तर त्याच्या शेजारी असलेला व्यक्ती त्याला सांगत होता की त्याना समजले आहे सगळं..आणि थांबवत होता..मला त्याच्याकडे स्वाभिमान दिसला.. खरंच वाटले की ही कष्ट करणारी मंडळी स्वतःचे दारिद्र्य सांगून कुणाला भीक मागत नाहीत.
हि मंडळी धुळे जिल्ह्यातून इकडे ऊसतोड करण्यासाठी येतात..अशिक्षित,एका घरात 4-5 मुले, मुलांना शाळा नाही कारण सतत फिरत राहतात.
परत येताना आम्ही चर्चा करत होतो की , आजकाल दिवाळीचा फराळाचे पदार्थ *"काय - काय"*खाऊ असा प्रश्न आपल्याला पडत असतो. पण ह्यांना *"काय"* खाऊ असा प्रश्न पडलेला आहे.
कपड्याच्या बाबतीत सुद्धा आपल्याला सर्वाना प्रश्न पडतो की आज कुठला ड्रेस घालू ? आज कुठली साडी नेसु? आपल्याला भरपूर पर्याय असतात. पण खरंच सांगतो ह्या लोकांकडे हा प्रश्नच नाहीय कारण त्यांच्याकडे *पर्यायच* नाहीत..
आपल्याला परम पूज्य सद्गुरू बापूंनि जुने ते सोने सेवे अंतर्गत एक सुवर्णसंधी दिलेली आहे. तरी सर्व श्रद्धावान मित्रांनी आपल्याकडील कपडे ( स्वच्छ, इस्त्री केलेले) , जुनी भांडी, मुलांची जुनी चांगली खेळणी ह्या शनीवारी केंद्रावर आणून द्यावीत आणि खऱ्या अर्थाने ह्या उपेक्षित लोकांच्या जीवनात दिवाळी आणून आपली दिवाळी साजरी करूया.
अंबज्ञ प्रवीणसिंह हलकीकर.
जय जगदंब , जय दुर्गे!!!
 
Ambadnya...
ReplyDeleteJai jagdamb,jai durge
कोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबीरसूचना
ReplyDeleteशिबीराच्या पहिल्या दिवशी, आजुबाजुच्या परिसरातील गावांमध्ये आपले कार्यकर्ते जाऊन ’जुने ते सोने’ या योजने अंतर्गत कपडे, भांडी, स्वच्छतेचे साहित्य व इतर वस्तु यांचे विनामुल्य वाटप करतात.
गावागावातून वाटप करण्यासाठी, या वर्षी खालील वस्तुंची खूप मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे :
१. ’जुनं ते सोनं’ या योजने अंतर्गत
- ४ ते ८ वयोगटातील मुलांसाठी शर्ट-पॅन्टस्,
- ९ ते १५ वयोगटातील मुलांसाठी शर्ट-पॅन्टस्,
- १६ वयोगटावरील पुरुषांसाठी शर्ट-पॅन्टस्,
- व स्त्रियांसाठी साड्यांची आवश्यकता आहे.
२. ‘विद्याप्रकाश’ योजने अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी मेणबत्या व काडेपेट्यांची
आवश्यकता आहे.
३. तसेच, ’वात्सल्याची ऊब’ या योजने अंतर्गत
- ० ते ४ व ४ ते ७ वयोगटातील मुलामुलींच्या स्वेटर्सची आवश्यकता
आहे.
तरी, कृपया सर्व श्रद्धावानांनी ह्याची नोंद घेवून जास्तीतजास्त शर्ट-पॅन्टस्, साड्या, स्वेटर्स तसेच मेणबत्या आणि काडेपेट्या देणगी स्वरूपात संबंधित काऊन्टर वर आणून द्यावेत.
हरिओम, वरील सूचनेप्रमाणे लागणार्या वस्तू हडपसर केंद्रात आपणजमा करत आहोत.
कृपया ईछुक श्रद्धावान भक्तानी खालील व्यक्तींशी
संपर्क साधावा.
दत्तात्रय मद्ने-9767237175
देवराव चावरे-9403923307
अम्बद्न्य, हडपसर उपासना केन्द्र.