आज खरोखर दिवाळी गोड झाली. सद्गुरु श्री. अनिरुद्ध बापुंच्या प्रेरणेतून हडपसर उपासना केंद्रामार्फत दि.३०/१०/२०१६ रोजी सहजपुर सोलापुर रोड येथील ऊसतोडणी कामगार वस्तीचा सर्वे करण्यात आलेला होता.
ऐन दिवाळीच्या लक्ष्मीपुजनाच्या दिवशी सदरच्या वस्तीवर अन्नाचे दुर्भिक्ष्य जाणवले. प्रत्येक झोपडीतील कामगार छोटेछोटे मासे दगडावर साफ करताना आढळला. खाण्यासाठी काही दुसरे नसल्याने जवळच्या कालव्यातुन ते मासे पकडुन खात आहेत असे समजल्यावर आम्हा सर्वांचे मन कळवळुन आले.
ज्या साखरेपासुन सर्व मिठाई बनते. ती साखर ज्या ऊसापासुन तयार करतात. तो ऊस तोडताना धारदार पात्यांनी रक्ताळलैली शरीरे ऐन सणासुदीच्या दिवसांत अन्नापासुन वंचीत राहतात त्यांनी तोडलैल्या ऊसाच्या साखरेपासुन बनविलेल्या मिठाईवर मात्र सर्व समाज मिटक्यामारत असतो. हा विरोधाभास मन विषण्ण करुन गेला.
सर्व हडपसर मधीलश्रद्धावानांनी आवाहनाला प्रतिसाद दिला. आपापल्या फराळातील वाटा देण्यात आला. आणि आज भाउबिजेच्या दिवशी फराळाचे वाटप करण्यात आले. ज्यांच्या अकारण कारुण्यामुळे समाजातील वंचितांची सेवा आम्हाकडुन करवुन घेतली.
त्या परमपुज्य सद्गुरुंचे आम्ही सदैव अंबज्ञ आहोत.
॥हरिॐ.॥श्रीराम॥अंबज्ञ॥












 
अंंबज्ञ
ReplyDeleteअंंबज्ञ
ReplyDelete