हडपसर परिसरातील सर्व श्रद्धावानांना नम्र आवाहन.
काल हडपसर उपासना केंद्रामार्फत सोलापुर रोडवरील खामगाव फाटा येथील ऊसतोडणी कामगार वस्तिवर सर्वेक्षण करण्यात आले.
दिवाळीत सर्व गोडफराळासाठी व मिठाईसाठी साखर वापरण्यात येते ती साखर ऊसापासुन बनवीण्यात येते , तो ऊस तौडण्याची प्रक्रीया अतिशय कष्टदायक असते. ऊसाच्या धारदार पात्यांनी कापल्याने अनेक जखमा होत असतात. त्याहुनही कष्टदायक व हलाखीचे आहे त्या ऊस तोडणी कामगारांचे जीवन .
ऐन दिवाळीत अन्नाचे दुर्भिक्ष्य, तर इतर वेळी काय याची कल्पना येते. सद्गुरु श्री. बापुंच्या प्रेरणेने आपण उद्या भाऊबीजेच्या दिवशी त्यावस्तीत फराळ वाटप करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी खालील ठीकाणी फराळ जमा करणेत यावा. १)विलाससिंह कुलकर्णी फुरसुंगी.२)सुभाषसिंह देवरकर ,भेकराई नगर ३)राजेंद्रसिंह कुलकर्णी ,ससाणेनगर.
हरिॐ ॥वरील फराळवाटपसेवा ऊद्या दुपारी दि.१/११/२०१६ रोजी करण्याची असल्याने फराळ दुपारी १२वाजेपर्यंत पोचविणेत यावा. अंबज्ञ
 
No comments:
Post a Comment